वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
रिसोड तालुक्यातील रिठद हे गाव सर्वात मोठे असून लोकसंख्येने, सुशिक्षिताच्या संख्येने, नोकरीत असलेले समजदार व्यक्तिमत्वाचे लोक या गावात आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत मात्र सर्वात मागून क्रम क्रमांक लागतो असे गाव. रिठद गावातील वार्ड क्रमांक तीन- चार या दोन्हीच्या जोडावर असलेला खड्डा,कित्येक वर्षे लोटली असा कायम खड्डा, त्यामध्ये साचलेले पाणी त्यापासून होणारी डासाची उत्पत्ती आणि प्रत्येक जण त्या रस्त्याने जात असतो साचलेल्या खड्ड्यातले पाणी कधी दिसले नाही? ना ग्रामपंचायत अधिकाऱ्याला दिसले?,
ना सरपंच, ना सन्माननीय सदस्य त्यामुळेच निष्क्रियतेमुळेच हा खड्डा कायम पाण्याने भरलेला राहिला व त्यावर मच्छरांची डासांची उत्पत्ती होतांना दिसते आहे. त्यातच दिवाळी आली सर्व लोक आपल्या घरातली साफसफाई करतात. परंतु माझी कोण करणार? अशी आर्त हाक या खड्ड्यातील पाण्याची येत असते. माझ्यात भरलेले दुर्गंधीयुक्त पाणी गाडीने वळून निघून जातात. परंतु या बाबीकडे लक्ष तरी द्यायचं कोणी द्यायचे.असा प्रश्न सर्वांच्या लक्षात यायला किती वर्ष लागणार? हा एक प्रश्न असून हे एक अनुत्तरीत राहिलेला कायम प्रश्न आहे!