Risod : पलसिद्ध कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे लेकीचा- बापाचा, जीव जाता-जाता राहिला.

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील

 

दिनांक १८/१०/२०२४ रोजी सायंकाळी ५ वा.रिसोड तालुक्यातील रिसोड (risod) ते सेनगाव या रस्त्यावर पलसिद्ध कंट्रक्शन कंपनीचे काम चालू असून या रस्त्यावरील रस्त्याचे दरम्यान हिरवीगार झाडे आहेत ती कापण्याचे काम चालू आहे. दरम्यान रस्त्यालगत वृक्ष आहेत लगतच विद्युत वितरण कंपनीचे (MSEB) पोल उभे असून त्यावर जिवंत तारा होत्या त्यामध्ये विद्युत प्रवाह चालू होता. असे कवठा येथील रहिवाशी आश्विन नेहूल यांनी सांगितले विषय असा आहे की आश्विन नेहूल हे आपल्या वय वर्ष सात वर्षे मुलीच्या शिकवणी साठी तिला घेऊन जात असतांना पलसिद्ध कंपनीचे काम रिसोड- सेनगाव मार्गावर चालू होते.

 

 

 

दरम्यान आश्विन नेहुल हे या रस्त्याने मोटरसायकल चालवत असतांना अचानक पलसिद्ध कंपनीच्या काम करणाऱ्या कामगारांनी पोकलेन मशिनरीच्या सहाय्याने झाडे पाडणे चालू होते त्या लगतच असलेल्या इलेक्ट्रिक पोलच्या तारावर हे झाड पडल्याने व आश्विन नेहूल व त्यांची मुलगी सोनाक्षी (वय वर्ष ७) तेथून मोटरसायकलने जात असतांना रोडच्या कडेला उभे असलेले पोल व त्यावर असलेल्या जिवंत तारा खाली रस्त्यावर पडल्या परंतु वेळीच ही बाब आश्विन नेहूल यांच्या लक्षात येतात अचानक ब्रेक दाबले त्यामुळे अनर्थ टळला व मोटरसायकल ही जागेवर पडली.

 

 

 

त्यामुळे लेकीचा व बापाचा जीव जाता-जाता वाचला. हा काळ काही सेकंदातच होता. याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला दिला असल्याचे आश्विनी नेहूल यांनी सांगितले. अशा गलथान कारभारामुळे कुणाचाही जीव जाऊ शकते परंतु आज ही घटना टळली . रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची व प्रवाशांची दक्षता घेऊनच कोणतीही कामे करावी असे त्याचे उपस्थितीत असलेल्या नागरिकाचे म्हणणे होते.