ravikant tupkar : रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाला सोडचिट्टी का ??..

ravikant tupakar

 

 

 

ravikant tupkar  : रविकांत तुपकर ravikant tupkar हे गेली चार वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या swabhimani shetkari sanghatna ऊस परिषदेसह दोन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीना हजर राहिले नाहीत. याउलट ते संघटनेचे नेते राजू शेट्टी raju shetti यांच्यावर टीका करीत आहेत. चळवळीचे नुकसान होऊ नये म्हणून आतापर्यंत खूप सहन केले. यापुढे स्वाभिमानी संघटना व पक्षाशी तुपकर यांचा संबंध नाही.

 

 

 

त्यांचे संघटनेतील योगदान पाहता, त्यांना काढून टाकले हा शब्द आपण वापरणार नाही, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेली २२ वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली राजू शेट्टी raju shetti लढत आहेत. स्वर्गीय शरद जोशी sharad joshi   यांच्यानंतर कष्टकऱ्यांना आपले वाटणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो; पण रतिकांत तपकर दे सातत्याने राज शेट्टी यांच्यावर टीका करीत आहेत. ‘स्वाभिमानी’ संघटना हा परिवार आहे, यामध्ये काही मतमतांतरे असतील तर चर्चेतून मार्ग निघाला असता; पण, तुपकर सोशल मीडियातून सातत्याने चळवळीला हानिकारक वक्तव्य करीत आहेत.

 

 

 

आता तर ते पुण्यात बैठक घेऊन स्वतंत्र सभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण, २६ सप्टेंबर २०१९लाच तुपकर यांनी स्वाभिमानी पक्ष व संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, तरीही त्यांना राज्य कार्यकारिणीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रण दिले होते, ते आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा ‘स्वाभिमानी’शी काही संबंध नाही.