rape news : क्लासला class जाणाऱ्या १७ वर्षीय तरुणीवर एका अनोळखी रिक्षाचालकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत vasai समोर आला आहे. वालीव पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी वसई पूर्वेला राहते. बुधवार १७ जुलै रोजी ती घरातून संगणक क्लासला computer class जाण्यासाठी निघाली होती. ती एका रिक्षात बसली.
तिच्या पायाला असलेले व्यंग रिक्षाचालकाने हेरले. बोलून तिचा विश्वास संपादन करून तुझे व्यंग ठिक करणारे औषध असल्याची थाप रिक्षाचालकाने मारली. त्यामुळे मुलीचा विश्वास बसला. त्याने तिला क्लासला न नेता ‘शिरसाड फाटा’ येथून एका लॉजवर नेले. उपचाराच्या नावाखाली त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र नंतर पीडित तरुणी घाबरून तेथून निघून आली. नंतर हा प्रकार तिने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.