दुर्दैवी ! रेल्वे रूळ बदलताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव…

रेल्वे रूळ

दुर्दैवी ! रेल्वे रूळ बदलताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव… परभणीच्या parbhani ‘सेलू ते सातोना’ रेल्वे स्टेशन railway station दरम्यान पावडे हादगाव परिसरात रेल्वेचे रूळबदलण्याचे काम सुरूआहे. हे काम ट्रॅक्टरच्या हेडच्या साह्याने करत असताना एका ३२ वर्षीय तरुणाच्या अंगावर ट्रॅक्टरचे हेड पडून त्याचे जागीच निधन झाले.

 

 

ही घटना रविवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ११ च्या नंतर घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू सातोना रेल्वे टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर रेल्वेचे रुळ ट्रॅक्टर हेडच्या साह्याने बदलताना हा अपघात झाला. जमीनी पासुन उंचीवर लावलेले ट्रॅक्टरचे हेड, पटरीची उंची आणि करत असलेल्या कामाच्या वेळी अचानक ट्रॅक्टरचे हेड पलटी झाले. या पलटी झालेल्या हेडच्या खाली ट्रॅक्टर चालक सुरेश प्रल्हाद जाधव suresh pralhad jadhav वय ३२ वर्षे राहणार वरफळ तालुका परतुर जिल्हा जालना सापडून जागीच मरण पावला.

 

 

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलिस नायक माधव कांगणे, पोलिस शिपाई शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.