Pusad : शिक्षिका teacher असलेल्या आदिवासी महिलेला व्हॉट्सअॅपवर whatsapp अश्लील व्हिडीओ पाठवून त्रास देणाऱ्या पोलिस जमादारावर वसंतनगर पोलिसांनी vasantnagar police अखेर शुक्रवारी रात्री उशिरा गंभीर गुन्हे दाखल केले. या जमादारासह त्याच्या सहकाऱ्यांवरही अॅट्रॉसिटीसह(atrocity) विविध कलमांन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नीलेश पेंढारकर (nilesh pendharkar) असे या जमादाराचे नाव आहे. पोलिस जमादार नीलेश पेंढारकर सुरेश हराळ, सविता बळी, शिल्पा नीलेश पेंढारकर तसेच सुरेश हराळ यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
या जमादाराने महिलेकडे शरीरसुखाची मागणी करीत दोन लाखांची खंडणी मागितली होती. मागणी पूर्ण न केल्यास शिक्षिकेच्या पती व मुलाविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. त्यावर महिलेने जमादाराला चांगलेच फटकारले. २० जून रोजी तक्रार देण्यासाठी त्या वसंतनगर पोलिस स्टेशनमध्ये (vasantnagar police staion) आल्या. त्यादरम्यान पोलिस जमादार ‘नीलेश पेंढारकर’ याने महिलेचे घर गाठले. महिलेच्या शिक्षक पतीस त्याने साथीदारांसह रस्त्यावर बेदम मारहाण केली. त्या घटनेची तक्रार देण्यास शिक्षक पतीसुद्धा वसंतनगर पोलिस स्टेशनला police station पोहोचले. परंतु, पोलिसांनी एनसी स्वरूपाचे साधे गुन्हे दाखल करून आरोपी जमादारास सहकार्य केले. त्यामुळे पीडित शिक्षक पती-पत्नीने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात धाव घेतली.