Posco : 42 वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीला बुलढाणा सोडतो म्हणून गाडीवर बसवलं आणि समोर घडली आपबीती.

Posco
Posco

 

 

धाड पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या एका शेजारील गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीविरोधात १८ जुलै रोजी पोक्सोअंतर्गत posco गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाड शेजारील एका गावातील अल्पवयीन मुलगी बुलढाणा येथे कामानिमित्त इजा करत असते. सकाळी धाड बसस्थानकावरून बुलढाण्यासाठी बसेसचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ही मुलगी १८ जुलै रोजी बसस्थानकावर बसची वाट पाहत उभी होती. तेव्हा तिथे गाडी घेऊन आल्यानंतर, भगवान नागू उबाळे (४२) याने तिला बुलढाणा येथे सोडून देतो, असे सांगत दुचाकीवर बसविले.

 

 

 

तो पीडित अल्पवयीन मुलीच्या परिचयाचा असल्याने तिने ते धाडस केले. परंतु धाडपासून काही अंतरावर गेल्यानंतर भगवान नागू उबाळेने मुलीसोबतच दुचाकीवरच छेडखानी सुरू केली. त्यामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली होती. दुचाकी थांबविण्याचे तिने सांगितल्यानंतरही उबाळेने दुचाकी थांबली नाही. त्यामुळे धाडस करून मुलीने दुचाकीवरून उडी मारल्याचे तक्रारीत नमुद आहे. याप्रकरणी पिडीताच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी आरोपी भगवान उबाळेविरुद्ध अप न २०९/२०२४ कलम ७४,७५,७८ बीएनएससह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.