nanded news : विडिओ काढत पोलीस पाटलाने घेतला गळफास…

nanded news

nanded news : हदगाव तालुक्यातील पेवा peva येथील पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव balaji keshav patil यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जाधव यांनी मृत्युपूर्वी केलेल्या व्हिडीओत हदगावचे पोलिस उपनिरीक्षक भडीकर bhadikar यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. पोलिस पाटील बालाजी जाधव balaji jadhav हे सोमवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते.

 

 

 

त्यांना काही कामानिमित्त हदगाव hadgaon येथे जायचे होते. ते कार्यालयात आले, तेव्हा बंद होते. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी गावात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची झोपण्याची व्यवस्था म्हणून अंथरुण-पांघरुण आणले होते. ते ग्रामपंचायतच्या एका खोलीत होते. ते नेण्यासाठी त्यांनी खोली उघडायला लावली. त्यानंतर छताला नायलॉन दोरीने गळफास घेतला. बराच वेळ झाला, तरी पोलिस पाटील बाहेर का आले नाही, म्हणून ग्रामस्थांनी आत डोकावून पाहिले असता, त्यांना जाधव यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. मयत जाधव यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

 

 

 

व्हिडीओत काय म्हटले?

माझ्या मृत्यूला ‘पीएसआय भडीकर’ हे जबाबदार आहेत. त्यांनी माझ्यावर एवढा अन्याय करायला नको होता. पूर्ण माहिती देऊनही घटनेची मी माहिती लपवून ठेवली, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. गावाने शांततेत राहावे. माझी ज्येष्ठ नागरिकांची सेवा होती, ती अपुरी राहिली. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो, असे जाधव यांनी मृत्युपूर्वी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.