तरुणांना सुवर्ण संधी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नळ जलमित्र होणार नियुक्ती ; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख…

नळ जलमित्र

तरुणांना सुवर्ण संधी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नळ जल मित्राची होणार नियुक्ती ; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख…जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, प्लम्बर, मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नळ ‘जलमित्र’ यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी २६ सप्टेंबरपर्यंत आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करता येणार आहे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी, या उद्देशाने प्रतिग्रामपंचायत तीन नळ जलमित्र यांची निवड करण्यात येणार आहे. तिन्ही पदांसाठी प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायतने ९ उमेदवारांचे नामनिर्देशन व त्याची माहिती अॅपवर भरायची आहे.

 

 

 

ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्लंबर गवंडी, मोटर मेकॅनिक फिटर व इलेक्ट्रिशियन / पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार अाहे. ग्रामसेवकांमार्फत २६ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. कौशल्य संचसाठी, एक ट्रेडसाठी एक उमेदवारप्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे