हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली , हावडा-मुंबई howrah-mumbai mail मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात accident झाला आहे. या रेल्वेचे सर्व डब्बे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात २५ हून अधिक नागरिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान झाला.
जमशेदपूर, झारखंड येथे हावडा-मुंबई howrah-mumbai मेल एक्स्प्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या सर्व बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजखरस्वान आणि बडाबांबो दरम्यान मंगळवारी पहाटेm३.४३ वाजता झाला. या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही ‘बोगी रुळावरून’ घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाल्याच्या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.