maval crime : अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरलं !

maval crime

maval crime : प्रेमसंबंधातून ‘गरोदर’ राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन मुलांनाही जिवंतपणे नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

मावळ तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिलेसह तिचा पाच वर्षीय मुलगा आणि दोन वर्षीय मुलगा यांची हत्या झाली. गजेंद्र जगन्नाथ दगडखैर gajendra jagnnath dagadkhair  (३७) रा. वराळे, ता. मावळ, रविकांत भानुदास गायकवाड ravikannt bhanudas gaikwad (४१) रा. सावेडी, ता. जि. अहमदनगर, गर्भपात करण्यासाठी मदत करणारी एजंट महिला, कळंबोली येथील हॉस्पिटल मधील संबंधित डॉक्टर व त्यांना मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.