Marathwada earthquake : मराठवाडा हादरला ; ३ जिल्यात भुकंम्पाचे धक्के…

Marathwada earthquake

Marathwada earthquake : आज मराठवाडा marathwada हादरला अनेक ठिकाणी ‘भूकंपाचे धक्के’ जाणवले , त्यामध्ये हिंगोली hingoli  , नांदेड nanded  आणि परभणी parbhani या ठिकाणी भूकंपाचे धक्के earthquake जाणवले असून जालना , संभाजी नगर आणि वाशीम मध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले . सकाळी ७:१५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 

 

आज सकाळी मराठवाडा भूकंपाच्या marathwada earthquake धक्क्यांनी हादरला. मराठवाड्यातील marathwada  तीन जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून balapur 13 किमीवरील दांडेगाव दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

 

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी भीतीने घराबाहेर पळ काढला. तर अनेक ठिकाणी घरांना भेगा गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांकडून केला जातो आहे. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी 7.15 मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला आहे.

 

 

 

परभणी parbhani शहर, सेलू, गंगाखेड आदी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर हिंगोलीच्या hingoli पिंपळदरी, राजदरी, वसमतमध्ये भूकंपाचे सौम्या झटके जाणवले आहेत. 2 महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात.