
Malkapur : भरधाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील पोलिसपाटील police patil जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हॉटेल यादगारनजीक सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तालुक्यातील कुंड बु, येथील रहिवासी तथा पोलिसपाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे नेहमीप्रमाणे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले.
सकाळी ९:४५ मिनिटांनी त्यांनी कुंड बु. फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हॉटेल यादगारनजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते. त्यावेळी ९:५२ मिनिटांनी मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चारचाकी (जीजे-१५, बिएफ-२५६४) भरधाव येत कवळे यांना उडविले. या घटनेतील धडक एवढी भीषण होती की, ते अक्षरशः फुटबॉलसारखे हवेत उडून खाली कोसळले. डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हिट अँड रनचा गुन्हा दाखल करा..!
महामार्गावर घडलेल्या घटनेत रस्त्यावर एका बाजूने नियमानुसार पायी जात असताना भरघाव चारचाकीच्या जबर धडकेत पोलिस पाटील ठार झाले, अलीकडेच अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. त्यामुळे याप्रकरणी ‘हिट अँड’ रनचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कुंड बु. ग्रामस्थांनी केली.
चालकावर गुन्हा दाखल
मलकापूर पोलिसांनी पोलिस पाटलांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चारचाकी वाहनाचा शोध घेतला. त्या वाहनचालकाविरुध्द कलम १०६ अन्वये निष्काळ- जीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला.
अपघात घडल्यानंतर त्या चारचा- कीतून लोक खाली उतरले. त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत पाहिले, पण घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा गाडीत बसून पोबारा केला. माणुसकी हीन कृती महामार्ग व्यवस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.