नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
पत्रकाराची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, रिसोड तालुका व शहर कार्यकारिणीचे नव्याने गठण करण्यात येवून नवनिर्वाचीत पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा व कार्यकारिणीची घोषणा रविवार ८ सप्टेंबर रोजी विश्राम भवन येथे आयोजित आढावा बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी होते.
कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष निनादबापू देशमुख, तालुकाध्यक्ष अरूण क्षिरसागर, शहराध्यक्ष प्रदीप खंडारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय भोयर, महादेव लांडकर उपस्थीत होते.राष्ट्रमाता मॉ जिजाऊ चौक येथे पत्रकार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात येवून खा. संजय देशमुख यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सोबतच खा. देशमुख यांनी तालुकाध्यक्ष अरूण क्षिरसागर समवेत नवनिवार्चीत सदस्याचा सत्कार केला.विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कार्य प्रेरणादायी असून संघटनेच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू असे आश्वासन खा. संजय देशमुख यांनी दिले. स्थानिक विश्राम भवन येथै आयोजित बैठकीत तालुका कार्यकारीणीच घोषणा करण्यात आली. यामध्ये सोबतच पत्रकार संघाच्या आरोग्य सेल जिल्हाध्यक्षपदी केशव गरकळ यांची घोषणा करण्यात येवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुका कार्यकारीणी अध्यक्ष अरूण क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. विलास ठाकरे, सचिव सचिन गांजरे, सरचिटणीस नारायण आरू, संघटक ज्ञानेश्वर कायंदे, कोषाध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकाटे, प्रसिध्द प्रमुख विजय सिरसाट, सहसंघटक अमर रासकर, सहसचिव प्रदीप देशमुख, सदस्य धैर्यशिल जोशी, अशोक चोपडे, डॉ. रामेश्वर रंजवे, संदीप देशमुख, कॅमरामन संतोष जुमडे यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यकारीणी प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे , सरचिटणीस विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, जिल्हाध्यक्ष निनाद देशमुख यांच्या मार्गदर्शनात गठण करण्यात आली आहे. यावेळी सोमाणी यांनी संघटनेमध्ये पद आणि व्यक्तीपेक्षा संघटन महत्वाचे आहे. संघटनेमध्ये जो काम करेल त्याच्या कार्याची दखल संघटना घेत असते. संघटनेचे कार्य जोमाने करून सामाजिक कार्यामध्ये पुढकार घेण्याचे आवाहन केले.
सोबतच प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या मार्गदर्शनात दिक्षाभूमि ते मंत्रालय पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाही बळकटीसाठी संवाद यात्रा काढण्यात येवून ही यात्रा यशस्वी झाल्याबद्ल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. मुंढे , आरोटे, सपकाळे यांच्या अभिनंदनाचा ठराव निलेश सोमाणी यांनी ठेवून अनुमोदन अरूण क्षिरसागर यांनी दिले. कार्यक्रमाला मोठया संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
संघटनेच्या बळकटीसाठी कटीबध्द राहून कोणतेही गालबोट लावू देणार नाही असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष निनादबापू देशमुख संचालन डॉ.कायंदे, तर आभार आयोजक शहराध्यक्ष प्रदीप खंडारे यांनी केले.