महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रिसोड तालुका अध्यक्षपदी अरुण भगवानराव क्षीरसागर यांची नियुक्ती.

 

 

नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी

 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या पत्रकार संघटनेच्या व सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पत्रकाराची एकमेव संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई ,या संघटनेचे श्री वसंत मुंढे, संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,श्री विश्वासराव आरोटे प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,श्री सपकाळे साहेब,यांचे आदेशान्वये आणि श्री निलेशजी सोमानी विदर्भ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई.यांचे नेतृत्वात वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील तालुका अध्यक्षपदी अरुण क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.

 

 

 

वाशिम जिल्ह्या संघटनेचे अध्यक्ष निनादभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९/८/२०२४ रोजी बैठक आयोजित करुन सर्वानुमते निवड झाली. वाशिम जिल्हाध्यक्ष निनादभाऊ देशमुख व गणेश देगावकर जिल्हा प्रसिद्ध प्रमुख यांच्या हस्ते अरुण भगवानराव क्षीरसागर यांना नियुक्ती पत्र,शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.आणी संघटनेसाठी चांगलं कार्य कराल अशी अपेक्षा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केली.व सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदीप खंडारे, डॉ. रामेश्वर रंजवे, अशोक चोपडे, नारायण आरु, अमर रासकर, ज्ञानेश्वर कायंदे, केशव गरकळ डॉ.प्रल्हाद कोकाटे, डॉ. विलास ठाकरे, विजय शिरसाठ, धैर्यशील जोशी, संदीप देशमुख, संतोष जुमडे इत्यादी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.