maharashtra politics : काँग्रेस नेते राहुल गांधी rahul gandhi यांच्या निषेध प्रस्तावाला विरोध करताना भाजप आमदार प्रसाद लाड prasad lad यांना शिविगाळ केल्याने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले. दानवे यांनी असंसदीय भाषा वापरली तसेच विधिमंडळाच्या परंपरेला न शोभणारे वर्तन केल्याने त्यांच्याविरोधात निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील chandrakant patil यांच्याकडून आणण्यात आला. हा प्रस्ताव मताला टाकत उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी तो मंजूर केला.
विधान परिषदेत दुपारी दोन वाजता सभागृह सुरू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अंबादास दानवे’ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. उपसभापतींनी दानवे यांचे निलंबन जाहीर केल्यावर विरोधकांनी उपसभापतींविरोधात घोषणा दिल्या. दानवे यांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात त्यांनी चर्चेची मागणी केली. मात्र मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग करत दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला.
सभागृह तीन वेळा तहकूब
निलंबनाच्या मुद्द्यावरून सभागृहात झालेल्या प्रचंड गदारोळामुळे सभागृह तीन वेळा तहकूब करण्यात आले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी भाजप सदस्यांनी दानवे यांच्यावर कारवाईची मागणी करत गोंधळ सुरू केला.
सभागृहाचे कामकाज एका तासासाठी थांबवण्यात आले. त्यानंतर १२ वाजता सुरू झालेले सभागृहाचे कामकाजही पुन्हा १ वाजेपर्यंत थांबवण्यात आले. त्यानंतर गदारोळा- नंतर पुन्हा दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक!
विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या आवाज दडपण्याचा प्रकार आहे. कितीही वेळा निलंबन झाले तरी जनतेच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू.