७० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या करून मृत शरीरावर 3 दिवस अत्याचार.

 

 

महिलां वरील होणाऱ्या अत्याचारामुळे आधीच महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. दररोज महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी अत्याचाराच् घटना घडतच आहेत. अगदी तीन वर्षांच्या चिमुकली पासून तर वृद्ध महिला या अत्याचाराला बळी ठरत आहेत. महाराष्ट्राला झालं तरी नक्की काय..? प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशातच एक लज्जास्पद व अगदी घाणेरडी घटना लातूर जिल्ह्यातील भेटा या गावात घडली आहे. येथे एका 35 वर्षीय नराधमाने 70 वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच साडीने गळफास देऊन हत्या केली व फक्त हत्या केली एवढेच नाही तर तिच्या मृत शरीरावर तीन दिवस सतत अत्याचार केले.

 

 

 

वृद्धेच्या शरीरावर तीन दिवस अत्याचार केल्याची कबुली दिली असून, क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. भेटा येथील एक ७० वर्षीय विधवा महिला पतीच्या निधनानंतर गेल्या २५ वर्षांपासून आपल्या मुलाला घेऊन माहेरी (बोरगाव नकुलेश्वर) येथे राहते.

 

 

स्वभावाने थोडी भोळसर असलेली ही महिला कधी कधी भेटा येथे आपल्या सासरी नातेवाईकांकडे जात असे. शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी ती भेटा येथे गेली असता मन्सूर सादीक होगाडे (३५ नराधम तरुणाने तिला काहीतरी धान्य देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावले. त्या रात्रीच तिच्यावर बलात्कार करून तिच्याच साडीने तिची गळफास देऊन हत्या केली. या घटनेची चर्चा होऊ नये म्हणून मृतदेह तसाच स्वतःच्या घरात ठेवून तो घरावरील पत्र्यावर झोपायचा.

 

 

 

शनिवारी सकाळी ११.३० वा. बाहेरगावी गेलेली आरोपीची आई घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी तत्काळ आरोपी मन्सर होगाडेला ताब्यात घेतले असून, बलात्कार करून हत्या केल्याची व त्यानंतर तब्बल तीन दिवस मृतदेहावर शारीरिक अत्याचार केल्याची तोंडी कबुली या विकृत आरोपीने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील नराधम आरोपी एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते.