आता ‘लाडकी बहीण’ ला मिळणार वर्षातून ३ गॅस मोफत बघा त्यासाठी काय पाहिजे..

'लाडकी बहीण'

 

 

 

  1. आता ‘लाडकी बहीण’ ladki bahin ला मिळणार वर्षातून ३ गॅस मोफत बघा त्यासाठी काय पाहिजे सरकारने ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून माझी लाड़की बहीण’ योजनेसाठी पात्र असलेल्या महिला भगिनींना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्यासोबतच आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलिंडरदेखील मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.

 

 

 

 

सद्यास्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेस पात्र असलेल्या लाभाथ्यर्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे. मंत्री छगन भुजबळ chhagan bhujabal यांच्या अन्न व नागरीपुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. शासनाचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार ajit pawar यांच्याकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

 

 

 

 

या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलिंडरचचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार केंद्रशासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्च्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभाथ्यर्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफल उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येणार आहे.