स्वच्छतागृहात सफाईकामगाराने काढला महिला डॉक्टरचा आक्षेपाहार्य विडिओ !

स्वच्छतागृहात

स्वच्छतागृहात सफाईकामगाराने काढला महिला डॉक्टरचा आक्षेपाहार्य विडिओ ! महिला डॉक्टरचा ‘आक्षेपार्ह व्हिडीओ’ चित्रित करण्याचा प्रयत्न मंगळवारी कांदिवली पश्चिमेतील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालयाच्या (शताब्दी रुग्णालय) स्वच्छतागृहात घडला. याप्रकरणी रुग्णालयातील सफाई कर्मचारी जयेश सोलंकीला jayesh solaki अटक केली आहे.

 

 

 

तक्रारदार डॉक्टर सकाळी रुग्णालयाच्या मंगळवारी महिला स्वच्छतागृहात गेल्या असताना सोलंकी याने बाहेरून त्यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रित करण्यास सुरुवात केली. हा प्रकार महिला डॉक्टरच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून रुग्णालयातील सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेत सोलंकी याला पकडले. तसेच शताब्दी रुग्णालय प्रशासनाने याची माहिती कांदिवली पोलिसांना दिली.

 

 

 

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिला डॉक्टरकडून ladies doctor घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर सोलंकी याच्याविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ७७ अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आम्ही सोलंकीला अटक केली आहे, अशी माहिती कांदिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी ‘लोकमत’ला दिली. पोलिसांनी सोलंकीचा मोबाइल फोनही ताब्यात घेतला असून, याआधी त्याने असा काही प्रकार केला होता का, याची चौकशी सुरू आहे.