खळबळजनक ! चक्क पीएसआयच निघाला हनी ट्रॅप honey trap चा म्होरक्या ! हनी ट्रॅप honey trap टोळीमध्ये शहर पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकाचा (पीएसआय) सहभाग असल्याचे आढळून आले आहे. काशिनाथ मारुती उभे maruti ubhe असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. टोळीतील महिलांना अटक केल्याची चाहूल लागताच उभे याने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, यापूर्वी विश्रामबाग पोलिसांनी, टोळीतील तीन महिलांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यातील एका महिलेवर कोल्हापूर kolhapur येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यात डॉक्टरला ५० लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले, टोळीने अशाप्रकारे आणखी काही जणांना जाळ्यात खेचून लुटल्याचा संशय आहे. बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रारी दिल्या नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार २९ जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अलका टॉकीज चौकातील सदाशिव पेठेतील ‘लॉजमध्ये’ घडला.
असे फुटले टोळीचे बिंग दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलिसांच्यातपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मनोज बरुरे manoj barure तपास करत होते. ज्या लॉजवर हा प्रकार घडला तेथील रजिस्टर आणि सीसीटीव्ही फुटेज बरुरे यांनी तपासले. त्या वेळी फिर्यादीसोबत प्रथम ओळख करणाऱ्या एका महिलेच्या आधार कार्डची माहिती हाती लागली.