Fraud : खोटेआमिष दाखवून घरकाम करणाऱ्या महिलांना कोटींचा गंडा

Fraud
Fraud

Fraud : स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून हातावर पोट असलेल्या ‘घरकाम’ करणाऱ्या ६० महिलांकडून लाखो रुपये उकळत २ कोटी ४० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी रविवारी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेला धमकावल्याचाही आरोप होत असून याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची (एनसी) नोंद करण्यात आली आहे. अविनाश भानजी आणि प्रमोद भानजी अशी या आरोपींची नावे आहेत.

 

 

 

मालाडच्या malad मढ परिसरात स्थानिक महिलांनी संघटना स्थापन केली असून त्यांच्याकडून अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आठ वर्षांपूर्वी संस्थेच्या सदस्या साधना भंडारे sadhana bhandare यांची ओळख भानजी बंधूंशी झाली. संस्थेतील सर्व महिलांना स्वस्त घरे देण्याचे आश्वासन देत परवडणाऱ्या घरांची योजना भानजी बंधूंनी bhanji bandhu मांडली. त्यांनी महिलांना मढ, शिवाजीनगर, मालाडमधील गेट क्रमांक तीन येथील जागा दाखवून त्यांच्या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यास प्रवृत्त केले. तेव्हा ६० महिलांनी घरांसाठी अर्ज केला.

 

 

 

यापैकी प्रत्येकाने ४ लाख भरले आणि आरोपींनी त्यांच्याकडून २.४० कोटी रुपये जमा केले. मात्र त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार विहित मुदतीत घर बांधण्यात ते अपयशी ठरले आणि त्यांनी या गरीब महिलांचे पैसेही परत केले नाहीत. फसवणूक उघडकीस येताच महिलांनी मालवणी पोलिसांत गेल्या रविवारी गुन्हा दाखल केला होता. मात्र तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला धमकावल्याचा आरोप असून याप्रकरणी ३० जून रोजी एनसी दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

आरोपी एकाच परिसरात राहतात आणि लहान-मोठ्या शिकवणीच्या नोकऱ्या करतात. सुरुवातीला त्यांनी इतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी दोन-तीन महिलांना घरे दिली. यात बळी ठरलेल्या बहुतांश महिला गरीब पार्श्वभूमीतील असून, रोजंदारी आणि मोलकरणीचे काम करत आहेत.