fertilizer : खतांच्या नावावर विकली चक्क माती !

fertilizer

 

 

 

fertilizer : पुण्याच्या ‘राना फर्टिकम’ या कंपनीने अनेक जिल्ह्यांत विक्री केलेल्या रासायनिक खत नमुन्यांचा अहवाल अप्रमाणित आला आहे. खताच्या नावावर कंपनीने माती विकून शेतकऱ्यांना करोडोंचा चुना लावल्याचे वास्तव समोर आले आहे. सन २०२२ पासून खत उत्पादनांसाठी कृषी विभागाचा परवाना असलेल्या या कंपनीद्वारा कोणत्या जिल्ह्यांत किती टन खतांची विक्री केली, याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

 

 

 

अमरावती जिल्ह्यात या कंपनीचे डीएपी व एनपीके या खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने कंपनीविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत या खतांची विक्री झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याआला. वर्धा जिल्ह्यात आर्वी येथेही याच कंपनीच्या बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आला. नांदेड जिल्ह्यातही या कंपनीच्या बोगस खतांची विक्री झाल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. कंपनीद्वारा आयएफएमएस प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक असताना मात्र असा कोणताही प्रकार कंपनीद्वारा झालेला नाही. आता तर कंपनीचा परवानाच कृषी संचालकांद्वारा रद्द करण्यात आला. या ऑनलाइन प्रणालीमध्ये या कंपनीद्वारा किती टन खत कोणत्या जिल्ह्यात विक्री केली, याची नोंद नसल्याने कृषी विभागाकडे कंपनीच्या साठ्याची माहिती नाही.

 

 

केंद्र सरकारचे अनुदानाचे श्रेणीमधील खते

या कंपनीद्वारा विक्री करण्यात आलेली रासायनिक खते chemical fertilizer ही केंद्र सरकारच्या अनुदानाचे श्रेणीमध्ये येत असल्याने या खतांची ‘आयएफएमएस’ प्रणालीद्वारे विक्री करणे बंधनकारक होते. मात्र, कंपनीद्वारा तसे करण्यात आले नाही; परंतु केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या ब्रँडच्या नावाने खतांची विक्री केली. कंपनीकडील आईसी प्रमाणपत्राची सद्यःस्थितीदेखील डिसअॅक्टिव्ह आहे.