देऊळगाव राजा |५ एप्रिल २०२६
देऊळगाव राजा येथे बनावट पोलिस बनून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘आम्ही पोलिस आहोत’ असे सांगत दोन अनोळखी व्यक्तींनी शेतकऱ्याची ९ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून नकली अंगठी देत पसार झाल्याची घटना २ एप्रिल रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
काही क्षणांतच आरोपींनी मूळ अंगठीऐवजी नकली अंगठी देत घटनास्थळावरून पळ काढला. प्रकार लक्षात येताच डोईफोडे यांनी तातडीने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१९(२), २०४ व ३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल समाधान गीते या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शहरात बनावट पोलिस बनून फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.
👉 Related News
- धक्कादायक! अशोक खरातच्या CDR मध्ये मंत्र्यांचे कॉल; ९ तासांच्या संभाषणामुळे खळबळ
- धक्कादायक! ‘चल एन्जॉय करू’ म्हणत महिलेचा विनयभंग; शेगावात आरोपीला अटक
- शासकीय कर्मचाऱ्यावर भरदिवसा हल्ला; SIR मॅपिंग करत असताना बीएलओला बेदम मारहाण
📢 Call To Action: अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत रहा. ही बातमी शेअर करून इतरांनाही सतर्क करा.











