crime news : संपत्तीच्या वादातून नातवानेच तीन मित्रांच्या मदतीने आजी आणि आजोबांची हत्या करून त्यांना नदीपात्रात फेकून दिले. ही धक्कादायक घटना ‘वाशिमच्या मानोरा’ Manora तालुक्यातील सोमठाणा somthana येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची माहिती ६ ऑगस्टला मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी प्रतीक संतोष वीर याच्यासह त्याच्या तीन आरोपी मित्रांना बुधवारी (दि.७) रात्री उशिरा अटक केली आहे.
अडाण नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची फिर्याद तोरणाळा toranala येथील पोलिस पाटील हरिदास प्रल्हाद राऊत यांनी ६ऑगस्ट रोजी मानोरा पोलिसात दिली होती. यावरून मानोराचे ठाणेदार प्रवीण शिंदे pravin shinde यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, हा मृतदेह सोमठाणा येथील प्रल्हाद दत्तराम वीर (७५ वर्षे) यांचा असल्याची ओळख पटली.
त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून संशयित आरोपी प्रतीक संतोष वीर याला मंगरुळपीर येथून ताब्यात घेतले. त्याने संपत्तीच्या वादातून मित्रांच्या मदतीने आजोबा आणि आजी यांची हत्या करून मृतदेह नदीपात्रात एक किलोमीटरवर आढळला आजीचा मृतदेह आजोबासोबत आजी निर्मला वीर यांचीही हत्या करून मृतदेह अडाण नदीच्या पात्रात फेकून दिला होता. आजोबाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी निर्मला वीर यांचा मृतदेह शोधण्यासाठी पिंजर येथील आपत्कालीन पथकाला पाचारण केले. या पथकाने पुलापासून १ किलोमीटर अंतरावर निर्मला वीर यांचा मृतदेह शोधून काढला.