crime : महाविद्यालयीन युतीस फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत केला अत्याचार !

 

crime

 

 

 

 

crime : महाविद्यालयीन युवतीस फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन सांगली आणि मिरजेतील कॅफेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अरिहंत संजय छंचुरे (वय १९, रा. बजरंगनगर कुपवाड) याला अटक केली आहे. पीडित युवती ही महाविद्यालयात शिक्षण घेते. अरिहंत याने तिच्याशी ओळख वाढवून मैत्री केली. दोघेजण एकमेकाला भेटू लागले. अरिहंत याने तिला ‘कॅफे’ मध्ये नेले. तिच्यासोबत काही फोटो काढले. त्यानंतर फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत दि. २० नोव्हेंबर २०२३ पासून सांगलीतील आणि मिरजेतील कॅफेमध्ये वेळोवेळी तिला बोलाविले. तेथे तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.