crime : गणेशपूर येथील रहिवासी तथा अमडापूर amdapur येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लर्क म्हणून काम करणारे नंदू श्रीराम धंदरे वय ४२ वर्षे हे दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. त्यांचा तपास हिवरखेड पोलिसांनी करून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नंदू धंदरे nandu dhandare चे प्रेत शेतातील धुऱ्यावर पुरवलेले होते ते १२ ऑक्टोबर रोजी उकरून काढले. पो. स्टे. हिवरखेड hivarkhhed हद्दीतील गणेशपूर ganeshpur येथील राहणारे व अमडापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लार्क म्हणून काम करणारे नंदू श्रीराम धंदरे वय ४२ वर्ष हे १८ ऑक्टोंबर २०२२ रोजीअचानक बेपत्ता झाले म्हणून त्यांची पत्नी सविता नंदू धंदरे यांनी हिवरखेड पोस्टेला तक्रार दिली.
सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार कैलास चौधरी यांचे मार्गदर्शना खाली गणेशपूर चे बिट इन्चार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल चव्हाण वत्यांचे सहकारी ना. पो. काँ प्रवीण जाधव हे करीत होते. त्यांना नंदू धंदरे यांचा ‘अनैतिक संबंधातून’ घातपात झाल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावरूनत्यांनीत्यादिशेने तपास करून दीपक शालिकराम ढोके वय २३ वर्ष रा. गणेशपूर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असतात्याचा मित्र अतुल गंगाराम कोकरे वय २८ वर्ष रा. गणेशपूर याने त्याचे नंदू धंदरे याचा मयत लहान भाऊ प्रकाश श्रीराम धंदरे याच्या विधवा पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून त्याचा अडथळा दूर करण्यासाठी त्याचा खून करून दिपक ढोके याचे मदतीने त्याचे प्रेत गणेशपूर ते उंद्री रोडला लागून असलेल्या त्याचे शेताचे धुऱ्यावर पुरले आहे.
असी कबुली दिल्यावरून सदरची माहिती ठाणेदार कैलास चौधरी यांनी वरिष्ठांना दिली व गुन्ह्यातील दोन्ही आरोपीना अटक करून एस. डी. पी. ओ ठाकरे साहेब, कार्यकारी दांडाधिकारी जाधव, गणेशपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पागोरे व इतर पोलीस व गावातील नागरिक यांचे उपस्थितीत आरोपीनी दाखविलेल्या घटनास्थळी खोदकाम केले असता मृतक नंदू श्रीराम धंदरे याचा हाडाचा सापळा मिळून आला वरून हिवरखेड पोलिसांनी आरोपीनविरुद्ध अ. नं. २१६/२४ कलम ३०२, २०१, ३४ भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठाचे मार्गदर्शनखाली हिवरखेड पो. स्टेचे ठाणेदार कैलास चौधरी करीत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांनी दिली.