नात्याला काळिमा फासणारी घटना ! भावानेच केला चुलत बहिणीवर अत्याचार… चुलतभावाने बहिणीवर ‘बलात्कार’करून नातेसंबंधाला कलंकित केल्याची घटना धामणगाव बढे dhamangaon bedhe पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी भावाला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तेरावर्षीय पीडित मुलगी व आरोपी हे नात्याने चुलत चुलत बहीण भाऊ आहेत. २३ वर्षीय आरोपीने १३ वर्षीय अल्पवयीन बहिणीला फुस लावून पळवून नेले होते. मोठ्या आईच्या घरी जात असल्याचे सांगून मुलगी त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेली होती. मात्र, त्यानेच तिला फूस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केला. तशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३७ (२), ६२, ६४ (२) (एफ) (एम), ६५ (१) सहकलम ४, ६ पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही तासांतच आरोपीस अटक केली. २६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बदलापूर, अकोला येथील मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. त्यानंतरही राज्यात विविध ठिकाणी महिला व मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत.
तीन दिवसांपूर्वी सिंदखेड राजा sindkhed raja तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथील ५६ वर्षीय शिक्षक खुशाल उगले याने १२ ते १४ मुलींचा लैंगिक छळ केल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली. अशा विकृत घटना समोर येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता चुलत भावानेच अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना मोताळा तालुक्यात घडली.