crime news : क्लास चालकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार ; मुलीची घरीच प्रस्तुती…

crime news

crime news : श्रीवर्धन shrivardhan  तालुक्यातील एका मुलीचा घरी प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. ती अल्पवयीन असताना श्रीवर्धन येथील क्लास चालकाने प्रेमसंबंधातून तिच्यावर ‘अत्याचार’ केला होता. मात्र, घटनेनंतर तो क्लास चालक फरार होता. त्याला दिघी सागरी पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून uttar pradesh अटक केली असून हेमंत गौतम hemant shinde असे त्याचे नाव आहे.

 

 

 

 

मृत्यू झालेली पीडित मुलगी हेमंत गौतम hemant gautam यांच्याकडे क्लाससाठी जात असे. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून काही महिने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यात ती अल्पवयीन असतानाच गरोदर राहिली. गेले काही दिवस ती नवी मुंबईतील जुगाव jugaon  येथे राहत होती. दरम्यान, १८ जुलै रोजी तिची घरीच प्रसूती झाली. यात तिचा मृत्यू झाला व जन्माला आलेल्या बाळाची प्रकृतीही नाजूक होती. त्याला नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता. यानंतर याप्रकरणी वाशी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तो दिघी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

 

 

 

पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे hanumant shinde यांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. उपनिरीक्षक ए.आर. शेख, शशिकांत बोकारे व गुणवंत जाधव या तिघांचे पथकाने आरोपीला उत्तर प्रदेश येथील राहत्या घरातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल असून गुन्हे तांत्रिक माहिती व इतर माहितीच्या आधारावर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.