chhatrapati shivaji maharaj waghnakhe : अखेर ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात पोहचली

chhatrapati shivaji maharaj waghnakhe

chhatrapati shivaji maharaj waghnakhe :छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा afajalkhan कोथळा बाहेर काढला ती वाघनखे waghnakhe बुधवारी साताऱ्यात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ती ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमध्ये victoria and albert museum असलेली ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत mumbai दाखल झाली.

 

 

 

 

त्यानंतर ही वाघनखे waghnahe साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली. या वाघनखांसह ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे शक्रवारी मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शनिवारपासून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. वाघनखे ७ महिने सातारा येथील संग्रहालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहतील.