chhatrapati sambhajinagar : आंतरधर्मीय प्रेम विवाह केला म्हणून चाकूने गंभीर वार…

chhatrapati sambhajinagar

chhatrapati sambhajinagar : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला. यात मुलाच्या पोट व मांडीत खोलवर वार करण्यात आले. अमित मुरलीधर साळुंके amit murlidhar solunke (२५) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री इंदिरानगरमध्ये indiranagar ही घटना घडली.

 

 

 

 

रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर पायी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अमितचा ११ वाजेच्या सुमारास अंधारातून ओरडण्याचा आवाज आला. त्याच्या वडिलांसह स्थानिकांनी त्या दिशेने धाव घेतली. तेव्हा अमित ‘पिंपळाच्या झाडामागे रक्तबंबाळ’ अवस्थेत पडलेला आढळला. तेथूनच त्याचे सासरे गीताराम भास्कर कीर्तिशाही व आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे त्यांना पळताना दिसले. अमितला तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. या घटनेमध्ये अमितच्या पोट व डाव्या मांडीत चाकूचे वार खोलवर गेले. गीताराम कीर्तिशाही व आप्पासाहेब कीर्तिशाही यांच्यावर जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.