Sakharkherda: बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे मिरवणुकी दरम्यान दगडफेक, अनेक जण जखमी.जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर.

Sakharkherda

 

sakharkherda: साखरखेर्डा येथे मिरवणुकी दरम्यान दगडफेक झाल्यामुळे जमावाचा पंगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा सुद्धा वापर केला. सविस्तर बातमी अशी की मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेक सुरू झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीमध्ये १० ते १२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.मिरवणूक माळीपुऱ्यातून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. त्याच वेळी पळापळ झाली.

 

 

 

यात माजी सरपंच कमलाकर गवई, माजी सरपंच दाऊदसेठ कुरेशी, माजी उपसरपंच आयुबसेठ कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांच्यासह दहा ते १२ जण जखमी झाले परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने अश्रुधुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला.त्यानंतर एका बाजूने हातात लाठ्याकाठ्या घेऊन काही युवक रस्त्यावर उत्तरले. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार स्वप्निल नाईक, रवी सानप आणि पोलिसांनी युवकांना पिटाळून लावले. याची माहिती मिळताच गावातील बाजारपेठही त्वरित बंद झाली.

 

 

 

दरम्यान, गुजरी चौकात पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त लावला असून माळीपुऱ्यातही पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे. बसस्थानक परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन मेहकर, बिबी, किनगाव राजा, बुलढाणा येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावली आहे. परिस्थीती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.