buldhana : जय देव जय देव जय शिवराया…आलो तवद्वारी आरती गाया ; आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

 

buldhana

 

 

buldhana : स्थानिक संगम चौकात भव्य दिव्य ‘शिवस्मारक’ झाल्यानंतर, आता बुलढाण्यातीलच buldhana राजमाता चौकात छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे बांधकाम झाले असून.. त्याचाच लोकार्पण सोहळा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव, मा. नगराध्यक्षा पुजाताई गायकवाड, न. पा. मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांच्याहस्ते तथा धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड sanjubhau gaikwad यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, युवा सेनेचे मृत्यूंजय गायकवाड यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

 

 

आ. संजय गायकवाड  sanjay gaikwad यांच्या संकल्पनेतून बुलढाणा buldhana शहरामध्ये महाराष्ट्रातील पहिलेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य-दिव्य मंदीर साकारले असून, मंदीराचा लोकार्पण सोहळा व शिवरायांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. हे मंदीर अतिशय कल्पकतेने बनविण्यात आले असून, मोहन पहाड व अरविंद होंडे बांधकामाची जबाबदारी पाहत आहे. छत्रपती शिवरायांची मुर्ती जयपूर राजस्थान येथून निलेश भुतडा यांनी परिश्रमपुर्वक आणली आहे. आता या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे मंदीर, भक्तीमय क्षेत्रातही आदर्श ठरणार असून या मंदीराच्या लोकार्पण व मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज मंदीर समिती प्रभाग क्र. ८ मधील सर्व नागरीक व राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ चौक मित्र मंडळ यांनी केली आहे.