buldhana news : काँग्रेस नेते तथा संसदेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधींनी rahul gandhi आरक्षण reservation संपवण्याबाबत केलेल्या तथाकथीत वक्तव्याचा समाचार घेतांना आ. संजय गायकवाड sanjay gaikwad यांनी जो कोणी राहुल गांधींची जीभ छाटेन त्याला ११ लाख रुपयांचे बक्षिस देईल, असे विधान केले होते. आज सोमवार १६ सप्टेंबर रोजी दुपारी केले.
विविध चॅनलवर हे प्रसारीत होताच, काँग्रेसकडून ‘आ.संजय गायकवाड’ यांच्यावर जोरदार टिका सुरु झाली. राहुल गांधींनी आरक्षणाबाबतचे वक्तव्य पुर्ण न पाहता केवळ त्याचा शेवटचा भाग पाहून विरोधी पक्षांनी जो फेक नेरेटीव्ह पसरवणे सुरु केले आहे, त्याचा निषेध करत आ. गायकवाड हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचे त्यांच्या तोंडून जीभ छाटण्याची आलेली भाषा अतिशय नींदणीय असून एका आमदाराने असे वक्तव्य करणे.. ही गंभीर बाब असून त्यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केवळ जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनीच नव्हेतर राज्यभरातून होवू लागली आहे.
अखेर आ. संजय गायकवाड यांच्यावर दाखल झाला गुन्हा
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३५१ (२), ३५१ (४) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काँग्रेसने बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथे ठिय्या मांडला होता. पोलिसांनी ८.१५ वाजता आ. गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आंदोलन थांबविले.