
खामगाव /प्रतिनिधी
जन्मदात्या दारुड्या बापानेच आपल्या स्वतःच्या दोन मुलींना नदीपत्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना ५ ऑक्टोबर रोजी खामगाव तालुक्यातील हिवरखेड या ठिकाणी घडली. या घटनेमुळे संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी निर्दयी बापाने पोलिसात कबुली दिल्यानंतर शहरानजीक असलेल्या भिकुंड नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. सविस्तर वृत्त असे की बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये लाखनवाडा येथील एकाने दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीत मुलीच्या वडिलावर संशय असल्याचे नमूद केले.
खामगाव तालुक्यातील कदमपूर येथील रहिवासी शेख हरून शेख शब्बीर याने काही दिवसा अगोदर त्यांची मुलगी कु. सदक व कु. आलिया (९) ह्या दोघी घरून बेपत्ता झाल्याची हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावेळी पोलिसांनी हरवल्याची नोंद करून दोन्ही चिमुकलींचा युद्ध पातळीवर तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांना दोन्ही चिमुकल्यांचा त्याचे वडील शेख हारून शेख शब्बीर याने अटाळी बस स्टॉप वरून दोन्ही चिमुकलींना ऑटो मध्ये घेऊन गेल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले.
शेख हारून शेख शब्बीर याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता तसेच खाकीचा धाक दाखवतात त्याने त्याच्या दोन्ही मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह मन नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली दिली. मन नदी पात्रात मयत चिमुकलींचे मृतदेह शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या वतीने नदीपात्रात दोघींचा शोध सुरू होता.