BSNL news : देशातील दूरसंचार क्षेत्रात लवकरच मोठी स्पर्धा निर्माण होणार असून याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. सरकारी दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ BSNL लवकरच ४जी ५जी रेडी युनिव्हर्सल सिमकार्ड आणि ‘ओव्हर द एअर’ सेवा लाँच करणार आहे. हे सिमकार्ड ग्राहकांना कुठूनही अॅक्टिव्हेट करता येईल.
दूरसंचार विभागाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ४जी-५जी सेवा सुरू केल्यानंतर ग्राहकांना कुठेही सिमकार्ड SIMCARD सुरू करता येईल. तसेच सिमकार्ड बदलूनही घेता येणार आहे. तसेच ग्राहकांना आपला मोबाइल नंबरही निवडता येणार आहे. ही सेवा नेमकी कधी सुरू करणार, याबाबत माहिती दिलेली नाही. देशात मोबाइल ग्राहक किती? ११६ कोटींपेक्षा जास्त मोबाइल ग्राहक दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार होते.