नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील बोरखेडी (borkhedi) येथील शेतकरी भिमराव शंकर जायभाये यांचे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गोठ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावून तीन गाई, दोन बैल ,एक वासरु, आणि शेतोपयोगी साहित्य जाळून खाक होऊन होऊन जवळपास पाच लाख रुपयांच नुकसान झालं आहे.
सदर घटना ही रात्री १ वाजता नंतर घडल्याचे पाहणी वरुन अंदाजे लक्षात येते आज सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या गावकऱ्यांच्या निदर्शनास आली तो पर्यंत सर्व जाळून खाक झाले होते.बोरखेडी येथील तलाठी,तसेच वाकद येथील पशू संवर्धन अधिकारी यांनी स्थानिक जागेवर येऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
तरी प्रशासनाने भिमराव जायभाये यांच्या झालेल्या नुकसानीची आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली.