बदलापुर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलींसाठी पोस्को अंतर्गत ठेवली जाणार तक्रार पेटी..

 

 

 

 

 

राज्यातील सर्व शाळांमध्ये पोस्को मुलींसाठी तक्रार पेटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बदलापुर मधील एका  प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण एक आठवडा उलटून गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून  याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ही केस “फास्ट ट्रॅक” कोर्टात चालवू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

 

 

राज्यातीलच शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत दहा मिनिटे माझ्याशी चर्चा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

आजच सूचना काढणार

पोस्को अंतर्गत ई बॉक्स संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यासोबत तक्रार पेटीही ठेवायला हवी. त्यातील तक्रारीवर तात्काळ कारवाई व्हायला हवी, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील. यासंदर्भात आजच अधिसूचना काढू, असे केसरकर म्हणाले. राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन केली जाईल. शाळा पातळीवर याचे नियोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

 

 

शाळेतील सर्वांवर निलंबनाची कारवाई

 

बदलापूरची घटना १३ ते १६ ऑगस्ट दरम्यान घडली. १७ ऑगस्टला तक्रार देऊनही करवाई न करणान्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका, संबंधित शिक्षिका आणि इतरांना निलंबित करण्यात आल्याचे केसरकर म्हणाले