badlapur encounter news : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच एन्काउंटर.बघा सविस्तर घटना.

badlapur encounter

badlapur encounter news : राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील badlapur खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे akshay shinde याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

 

 

२ चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याबद्दल शिंदेविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. त्याच्या दोन पत्नींनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा ‘तळोजा’ taloja कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे nilesh more यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला.

 

 

 

यात मोरे गंभीर जखमी झाले. शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या, त्यात तो गंभीर जखमी झाला. कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या माहितीस दुजोरा दिला. मृतदेह जे. जे. रुग्णालयात पाठवणार अक्षयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी रात्री उशिरा दिली.

 

 

 

अत्याचार ते एन्काउंटर; असा घडला घटनाक्रम

१२ व १३ ऑगस्ट, २०२४ :

बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड

१६ ऑगस्ट: बदलापूर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला

१७ ऑगस्ट : अक्षय शिंदेला अटक

२० ऑगस्ट : बदलापूरमध्ये शाळेत

तोडफोड व रेल्वे रोको आंदोलन १९ सप्टेंबर: अक्षय शिंदेविरुद्ध

कल्याण न्यायालयात आरोपपत्र

२३ सप्टेंबर: अक्षय शिंदे याचा पोलिस चकमकीत मृत्यू, नंतर बदलापुरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

 

 

 

सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता असा घडला एन्काउंटरचा थरार…

दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडद्वारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते.

मुंबा बायपास येथे अक्षयने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून तीन राउंड फायर केले. यात मोरे जखमी झाले.

अचानक घडलेल्या या घटनेनंतर तो तावडीतून पळून जाऊ नये, म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली.

या एका गोळीतच अक्षय शिंदे याचा खात्मा झाला, कळवा महापालिका रुग्णालयात डॉक्टरांनी पुष्टी केली, असे ठाणे पोलिस पीआरओंच्या पत्रकात नमूद आहे.