anil parab : विधान परिषदेच्या ‘मुंबई पदवीधर’ आणि शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने बाजी मारली आहे. पदवीधर मतदारसंघातून उद्धवसेनेचे अनिल परब हे विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदेसेनेचे किरण शेलार यांचा २६,०१२ मतांनी पराभव केला, तर शिक्षक मतदारसंघातून उद्धवसेनेचे ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षक भारतीचे मोरे यांचा पराभव केला आहे .
कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय संपादित करून विजयाची हॅट्ट्रिक साधली. शेवटच्या फेरीची मतमोजणी जाहीर होईपर्यंत डावखरे यांनी ६२ हजारांची आघाडी घेतली होती. उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचं गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता आहे. पण आता शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली. ठाकरेंनी मविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे 4 उमेदवार मुंबईतील लोकसभांच्या जागांवर उभे केले होते.
या चार पैकी तीन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर चौथे उमेदवार अमोत कीर्तिकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला. यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे.