प्रदिप देशमुख /प्रतिनिधी/ रिसोड
वाशिम – अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनवाढ, ग्रॅज्युटी, दरमहा पेन्शन, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद वाशिम समोर जेल भरो आंदोलन सतीश चौधरी जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात दि. 19 सप्टेंबरला करण्यात आले. महिला व बालविकास विभागाने दरमहा पेन्शन, ग्रॅज्युटी मानधन वाढ याविषयी प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत. संबंधित आदेश शासनाने निर्गमित करावे. यानंतर सुद्धा शासनाने आदेश काढले नाही. तर कृती समितीचे नेते अंगणवाडी कर्मचाऱ्यांं समवेत दि. 23 सप्टेंबर 2024 पासून उपोषणास बसणार आहेत.
प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी. वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 19 सप्टेंबरला जेल भरो आंदोलन केले. दरम्यान आमदार अमित सुभाषराव झनक यांना सुद्धा त्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात शेततारक काटकळे, कौशल्या ताई बिलखेडे, रंजनाताई सुद्रिक, चंद्रकला तायडे, वर्षा भुते, रेखा शिंदे, मालुताई धामे, प्रमिळ पखाले, श्रुती कथले, भारती इंगळे, आम्रपाली पठाडे,पतकी ताई, सुनिता इंगळे, दयाराम भगत आदीसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.