Amravati rape news : एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार samuhik atyachar केल्याची धक्कादायक घटना चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या chandur relway police station हद्दीत २९ जून रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० च्या सुमारास घडली. याप्रकरणी एकूण चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना मंगळवार, ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या डोळ्यांत रेती टाकून व चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला.
चारपैकी दोन संशयितांनी तिच्यावर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचारदेखील केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी ६ जुलै रोजी पहाटे २:३६ च्या सुमारास आरोपी अक्षय प्रकाश खाडे (२५), राजेश शंकर कोहळे (३०), काल्या ऊर्फ आकाश जगदीश पिल्लारे (३०) व शिवाजी बंडूजी चौधरी (२७ यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न व पोक्सो व अॅट्रॉसिटी pocso & atrocity अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १६ वर्षीय पीडिता ही २९ जून रोजी गावातीलच एका किराणा दुकानातून काही चीजवस्तू घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी ‘शिवाजी चौधरी’ याने तिला आवाज दिला.
तुला आजीकडे सोडून देतो, अशी बतावणी करून त्याने तिला दुचाकीवर बसविले. तिला आजीकडे न नेता आरोपी तिला गावाहून थोड्या दूर अंतरावर घेऊन गेला. शिवाजी चौधरीने shivaji chaudhari तिच्यावर बलात्कार व अनैसर्गिक अत्याचार केला. तिने नकार देऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, शिवाजीने तिच्या तोंडात व डोळ्यांत तेथील रेती टाकली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चाकूने तिला जिवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला.
दुचाकी मालकासह तिघे पोहोचले
शिवाजीने दुचाकीमालक राजेश कोहळेला rajesh kohale तेथे बोलावून घेतले. त्यानेदेखील तिच्यावर शारीरिक अत्याचार केला, तर शिवाजी व राजेशचा माग घेत आरोपी अक्षय खाडे व काल्या कोहळेदेखील तेथे पोहोचले. त्यांनी शिवाजी व राजेशला shivaji and rajeshअटकाव न घालता घटनेबाबत मौन बाळगले. आरोपींनी पीडितेला रात्री १० नंतर घरी पोहोचून दिले. त्या घटनेने ती प्रचंड घाबरली. शून्यात हरवली. त्यानंतर तिने ५ जुलै रोजी पालकांसह पोलिस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली.