आठवीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू.आई वडिलांना होता एकुलता एक .

 

कट्टा न्यूज नेटवर्क

 

आठवीतील विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील १३ वर्षाच्या शाळकरी विद्यार्थ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे समजले आहे. अब्दुल मुजाहिद अब्दुल वाजिद असे या बालकाचे नाव असून, तो आठव्या वर्गात शिकत होता.

 

 

शाळेकरी मुलालाही आता हृदयविकाराचा झटका येत असल्याने सर्वच जण हादरले असून, या काकाणी शाळेत अब्दुल मुजाहिद अब्दुल वाजिद हा आठव्या वर्गात शिकत होता. रविवारी सकाळी त्याची आई झोपेतून उठविण्यासाठी आली असता तो उठत नव्हता. त्याच्या आईने खूप प्रयत्न करूनही तो उठत नसल्याचे घरातील मंडळीला सांगितले.

 

 

त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारार्थ तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.यावेळी डॉक्टरांनी त्याला हृदयविकाराचा झोपेत झटका आला असल्याची शक्यता वर्तविली होती.