
accident : काळाचा घाला ! मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या तरुणाचा वाढदिवसच ठरला शेवटचा दिवस ; तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना उलवे येथे घडली. अनिकेत पवार aniket pawar (२९) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचे इतर ६ मित्र किरकोळ जखमी झाले. अनिकेतचा वाढदिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे मित्रमंडळी व नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात मृत झालेला अनिकेत पवार हा उलवे ulwe येथील एका ट्रान्स्पोर्टरकडे चालक म्हणून काम करत होता. सोमवारी ३० सप्टेंबरला त्याचा वाढदिवस असल्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अनिकेतने आपल्या मालकाची कार घेतली.
होती. त्यानंतर रविवारी मध्यरात्री १२ वाजता अनिकेत पवार aniket pawar व त्याचे मित्र कारने न्हावा गावात गेले होते. या वेळी अनिकेतने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर जेवण करून सर्व मित्र घरी जाण्यासाठी निघाले. या वेळी त्यांची कार उलवेच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना, न्हावा गाव येथील वळणावर अनिकेतचे नियंत्रण सुटले व कार दोन-तीनवेळा पलटी मारून पडली. या अपघातात अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत बेलापूर belapur येथील हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात अनिकेतचे मित्र किरकोळ जखमी झाले असून, कारचे नुकसान झाले आहे.