marine drive suicide : दागिने काढले , मोबाईल वर चाटिंग केली आणि समुद्रात उडी मारली !

marine drive suicide

marine drive suicide : टीसीएस कंपनीत TCS company काम करणाऱ्या ममता कदम mamata kadam  (२३) या तरुणीने समुद्रात उडी घेत आपले आयुष्य संपवल्याची घटना सोमवारी घडली. सकाळी आईला कामावर जाते असे सांगून ती घरातून बाहेर पडली. तेथून तिने थेट मरिन ड्राइव्ह marine drive गाठले. तिथे तिने थोडावेळ मोबाइलवर चॅटिंग catting केले आणि नंतर समुद्रात उडी मारली.

 

 

 

प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तविला आहे.अंधेरी परिसरात ममता आई, वडील आणि भावासोबत राहायची. सहा महिन्यांपूर्वीच तिला टीसीएस कंपनीत TCS company नोकरी लागली होती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता कामाला जाते, असे सांगून ममता घराबाहेर पडली. त्यानंतर ती लोकलने चर्चगेटला charch gate उतरली. चर्चगेटवरून ती मरिन ड्राइव्हला marine drive गेली. त्या ठिकाणी मोबाइलवर तिने मित्रासोबत ‘चॅटिंग’ केले.

 

 

 

त्यानंतर तिने पावणेदहाच्या सुमारास मरिन ड्राइव्हच्या marine drive कट्ट्यावरून खाली समुद्रात उडी मारली. साडेदहाच्या सुमारास एक तरुणी बुडत असल्याचा नियंत्रण कक्षात कॉल येताच पोलिस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ममताला पाण्यातून बाहेर काढले. तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह marine drive पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

 

 

 

कट्ट्यावर ठेवली बॅग

समुद्रात उडी मारण्यापूर्वी तिने कट्ट्यावर सोडलेली बॅग पोलिसांच्या हाती लागली आहे. या बॅगेत तिचा लॅपटॉप, मोबाइल आणि कानातले, तसेच अन्य दागिने आढळले. तिनेच ते काढून ठेवल्याचा संशय आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेचा ममताच्या आईला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइलमधील चॅटिंगचा आणि आत्महत्येचा संबंध?

ममता कुणाशी मोबाइलवर चॅटिंग करीत होती. याचा तिचा आत्महत्येशी काही संबंध आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. मित्र, नातेवाइक, तसेच कुटुंबीयांकडे ती कुठल्या कारणाने तणावात होती का? याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.