crime news : लज्जास्पद ! काकानेच केला पुतणीवर अत्याचार…

crime news
crime news

crime news : संग्रामपूर sangrampur तालुक्यातील एका गावात काकाने अल्पवयीन पुतणीवर सतत चार वर्षापासून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार पीडितेने तक्रार दिली आहे. त्यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील एका गावात १ मे २०२० रोजी काकाने अल्पवयीन पुतणीला जबरदस्तीने भ्रमणध्वनीमध्ये असलेले अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यासोबत अश्लील कृत्य करीत असल्याचा फोटो काढला.

 

 

 

तो फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध विनयभंग करीत तिच्यावर ‘अतिप्रसंग’ केला. पीडितेचे वय १६ वर्ष ६ महिने आहे. सन २०२० पासून नराधम काकाकडून पीडितेवर वारंवार अत्याचार सरू होता. वैतागलेल्या पीडितेने ३० जूनला तामगाव पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून २ जुलै मंगळवारी रोजी आरोपी काकाविरुद्ध कलम ३७६, ३७६(२), (एफ), (जे), ३७६ (३), ३७६(२), (एन), ३५४, ३५४(अ), ३५४ (ड), ४५२, ५०४ ५०६ भादंवि सहकलम ४, ८, १०, १२, बाललैंगिक अत्याचार अधिनियमा २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असल्याची माहिती तामगाव पोलिसांनी दिली.