samruddhi : स्थानिक गुन्हे शाखेने दि. २६ आणि २७ जून रोजी केलेल्या कारवाईत समृद्धी महामार्गावर samruddhi highway जबरी चोऱ्या करणाऱ्या ९ चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी आतापर्यंत केलेल्या दहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावर चोरीच्या robbery घटनांत वाढ झाली होती. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा terkheda येथील ऋषिकेश जगदाळे यांना समृद्धी महामार्गावर दि. १० मे रोजी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील लॅपटॉप, रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते.
याप्रकरणी त्यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. जालना व मध्य प्रदेश राज्यातून ९ आरोपींना अटक केली आहे. मध्यप्रदेश राज्यातून समीर नूर मोहम्मद मेव, राकेश गुजल चंदेल, धरमराज विक्रम हरिजन या आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘जालना’ जिल्ह्यातून अभिषेक गवारे, रंगनाथ डनडे, विक्रम राजपूत, संतोष वाघमारे, राहुल कोकाटे, जावेद हबीब मुल्लानी या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी चोरलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यात येत आहे, तसेच गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.