mohammad siraj : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज mohammad siraj तेलंगणात पोलीस उपअधीक्षक बनला आहे. त्याने शनिवारी अधिकृतपणे डीएसपी पदाचा म्हणून पदभार स्वीकारला. सिराजने तेलंगणाचे पोलिस महासंचालक जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुलैमध्ये सिराजला निवासी भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. भारताने टी विश्वचषक जिंकल्यानंतर सिराजने मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली होती.
त्यावेळी ‘रेवंत रेड्डी’ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिराजचे अभिनंदन केले होते. सिराजकडे श्रेणी-१ च्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्र नव्हता. पण राज्य मंत्रिमंडळाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याला सूट दिली. “श्रेणी-१ च्या नोकरीसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. सिराज इंटरमिजिएट (१२ वी) उत्तीर्ण आहे. पण आम्ही त्याला श्रेणी-१ ची नोकरी देण्यासाठी शैक्षणिक पात्रतेत सूट दिली आहे,” असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते.