chikhali accident : काळाचा घाला..!! नादुरुस्त उभ्या बसमुळे घडला अपघात…आणि तिनही तरुणांचे गेले प्राण !.. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

 

 

 

चिखली/प्रतिनिधी 

 

chikhali accident : चिखली मेहकर chikhali mehkar रोडवर दुपारी ३ वाजेपासून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या चिखली chikhali आगाराच्या एस. टी. बसवर मोटार सायकलस्वार धडकल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहेत. याबाबत प्राप्त माहिती अशी की, ८ ऑक्टोबर रोजी चिखली आगाराची मानव विकास मिशनची बस १२ वाजता वाहक वरपे हे चिखली ते मेहकर chikhali to mehkar  घेवून गेले होते. मेहकरवरुन दुपारी २ वाजेच्या सुमारास बस क्रमांक एम. एच. ०६ एस ८८१६ ही मेहकरवरून mehkar परत येतांना या मार्गावरील वर्दडा फाट्याजवळ vardada fata बंद पडली म्हणून उभी होती.

 

 

 

असे असतांना रात्री ७. ३० वाजेच्या सुमारास सोलर फिटिंगचे काम करून मेहकरकडून  चिखलीकडे एम. एच. २८ बी. एल. ०८४६ या मोटरसायकलवरून जाणाऱ्या मोटारसायकल चालकाला रात्रीच्या अंधारात रोडवर उभी असलेली बस न दिसल्यामुळे ती मोटरसायकल गाडीवर धडकली. या भीषण ‘धडकेमध्ये’ मोटरसायकलवरील गोपाल पंढरीनाथ सुरडकर रा. बेराळा वय २० वर्ष, धनंजय प्रमोद ठेंग रा. वाघापूर वय १९ वर्ष, सुनील सुभाष सोनुने रा. रायपूर हल्ली मुक्काम खडकपुरा चिखली वय ३५ वर्ष हे तिघेजण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना चिखली सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या घटने संदर्भात अंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कडूबा डोईफोडे यांनी चिखली ग्रामीण रुग्णालयात येवून मृतदेहाचे पंचनामे केले. घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी कडूबा डोईफोडे करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

 

 

बसमुळे घडला अपघात….. अनं तिघांचे गेले प्राण…. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अवस्था अतिशय कठीण झालेली असून बसेस कुठेही बंद पडतात. अशीच घटना ८ ऑक्टोबर रोजी चिखली मेहकर रोडवर घडली. दुपारी २ वा. बंद पडलेली गाडी रात्रीपर्यंत रोडवरुन न हलविल्याने रात्रीच्या अंधारात मोटरसायकल स्वाराला गाडी दिसली नाही. त्यामुळे अपघात घडला. त्यामुळे रात्रीच्या वेळेस एस. टी. बस वर्दळीच्या रोडवर उभी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी मृतकांच्या नातेवाईकाकडून होत आहे