Washim : शेतकऱ्याकडून लाच स्वीकारताना रिसोड येथील जिल्हा जलसंधारण व मृदा संधारण उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

 

 

 

किशन काळे/रिसोड प्रतिनिधी

 

काकाच्या नावे शेती असल्यामुळे स्वतःच्या नावे करण्याकरिता मृदा  व जलसंधारण लाभ मिळकत प्रमाणपत्र मिळविण्याकरिता रिसोडच्या शेतकऱ्याकडून एक हजार रुपयाची लाच  स्वीकारताना रिसोड येथील जिल्हा जलसंधारण व मृदा संधारण उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक स्वप्निल वसंत जाधव यास वाशिम (washim) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.सविस्तर वृत्त असे की रिसोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने  काकाच्या नावाने जमीन शेती असलेली स्वतःच्या नावाने करण्याकरिता मुद व जलसंधारण विभागाकडून मिळवण्याकरिता 3 ऑक्टोंबर 2024 रोजी रीतसर अर्ज केला होता.

 

 

 

सदर शेतकऱ्याचा लाभ न मिळकत प्रमाणपत्र देण्याकरिता रिसोड येथील जलसंधारण व मुद्संधारण उप विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक स्वप्निल जाधव याने या कामाकरिता एक हजार रुपयाची मागणी केली होती.वारंवार विनंती करूनही काम होत नसल्याने तसेच लाचेची मागणी केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी वाशीम येथील लाल लुचपत कार्यालयामध्ये रीत सर तक्रार दाखल केली व यानंतर एसीबी कार्यालयाकडून पडताळणी केली व तसेच कनिष्ठ लिपिक स्वप्निल जाधव पक्ष समक्ष एक हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले .

 

 

 

त्यानंतर लाल लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी सापळा रचून कारवाई करून रिसोड येथील जलसंधारण व मुद जलसंधारण उपविभाग कनिष्ठ लिपिक स्वप्निल जाधव पक्षा समक्ष लाच रक्कम 1000 तक्रारदार यांच्या हातून स्वीकारताना रंगे हात लिपिक पकडला गेला. यानंतर रिसोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती ही कारवाई लाल लुचपत प्रतिबंध विभागाकडे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार सचिंद्र शिंदे वाशिम एसीबी चे पोलीस उप अधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी ती पलवाड व तसेच पोलीस हवालदार विनोद अवगळे विनोद मार्कंडे योगेश खोटे राहुल व्यवहारे रवींद्र घरात चालक पोलीस शिपाई नावेद शेख यांच्या पथकाने केली आहे या पूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत आहे.