बुलढाणा प्रतिनिधी / पुरुषोत्तम बोर्डे
buldhana : सुषमा खंडारे sushsama khandare यांचे पती माजी सैनिक maji sainik असून त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी आरोपीला शिक्षा व्हावी व सबंधित आरोपीला तात्काळ अटक करून त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कार्यवाही करावी या साठी दि.७ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषणाला आई वडील व बहिणी सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय jilhadhikari karyalay समोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, पती देउळगाव राजा येथे सहा महिण्यातुन एकदा आजारी पडत असायचे.
तेव्हा ते औरंगाबाद aurangabad येथील ‘सैन्यदलाची मोफत’ उपचार असलेल्या जेम्स या हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होत असत, त्यावेळेस त्यांचा आम्हाला मोबाईल येत असे तेव्हा मी त्यांना जेवणाची डबे वैगरे पूरवत होती. त्यावेळेस ते मला सांगत असत की मी आई व बहिणीच्या दबावाखाली असून काही गोष्टी सांगण्यासारख्या नाहीत व ते मला तुमच्या कडे येवू देत नाहीत. ऑक्टोंबर २०२३ च्या पहिल्या आठवडयात त्यांनी मला फोन करून भेटण्यास बोलावले होते व मुलांच्या भवितव्यासाठी सात लाख रू देतो असे सांगीतले होते परंतु मी देउळगाव खु. येथे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील सैन्यदलाच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाले असावेत असा माझा समज झाला, त्यानंतर भी दररोज वारंवार फोन लावला असता तो बंद असल्याचे सुषमा यांनी सांगितले.
त्यानंतर दि.१६ ऑक्टोंबर २०२३ रोजी लांबच्या नातेवाईकांनी माझे पतीचे निधन झाल्याची बातमी रात्री आठ वाजता सांगितली. तदनंतर माझे पतीच्या मृत्युची खात्री करण्यासाठी माझ्या सासरच्या नातेवाईकांना फोन केले असता त्यातील कोनीही माझे फोन उचलले नाही, त्यामुळे मी छ. संभाजीनगर येथील शेजाऱ्यांला घेवून गिरोली खु. येथे रात्री ११ वाजता पोहोचले असता त्यांनी आमच्या पोहोचण्याआधीअंत्यविधी उरकुन टाकला होता.
आम्हाला न कळवता व आमचे परवानगीशिवाय अंत्यविधी कसा काय उरकली ? याबाबत त्यांना मी जाब विचारला असता वरील आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालुन मला शिवीगाळ केली. त्याबाबत मी त्याच रात्री तातडीने देउळगाव राजा येथील पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी (अस्थी) राख सावडण्यासाठी आम्ही गेलो असता माझे पतीने आमच्यासाठी बॅन्केतून काढलेले सात लाख रूपयावरून माझ्या पतीची त्याच्या आई व बहिनीबरोबर बाचाबाची झाल्याची चर्चा लोकांमध्ये चालु होती.
हा विधी आटोपल्यावर मी पैश्याबद्दल व त्याचे बंदुकीबद्दल तसेच माझ्या नवऱ्याचा मृत्यु कसा झाला? याची विचारणा केली असता वरील सर्व आरोपींनी पैसे व बंदुक देण्यास नकार दिला व शांत राहा तु जमीनीत व घरात हिस्सा मागायचा नाही, नाहीतर तुझा कार्यक्रम करून टाकू असा दम मला दिला असल्याने पत्नी सुषमा यांनी सांगितले तर माझ्या अपत्याच्या जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. तरी माझे पती सुशिल सखाराम खंडारे रा. गिरोली खु. ता. देउळगाव राजा, जि. बुलढाणा यांच्या संशयास्पद मृत्युची चौकशी होवून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करावेत तसेच त्यांची सैन्य दलाकरवी मिळालेली बंदुक विनापरवाना आरोपींनी स्वतः चे कब्जात बाळगुन माझा व माझ्या दोन अपत्यांचा घातपात करण्याची शक्यता मी वर्तवली होती.
ती बंदूक शासनाने ताब्यात घेवून माझ्या करवी कायदेशीर प्रक्रीयेद्वारे विक्री करणेसाठी माझ्या ताब्यात मिळावी व या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे लेकराबाळासह आमरण उपोषण करण्याची तसेच दि ११ नोव्हेंबर २०२३ ला आझाद मैदान मुंबई येथे आत्मदहन करण्याची नोटिस दिली होती तद्नंतर मी दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी पोलिस स्टेशन देउळगावराजा मधुन फोन आल्याने मी पोलिस स्टेशनला गेले असता, पोलिसांनी आत्मदहन करणार नाही असे लिहून घेवून आपणास मदत करू व न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिले होते, तरी माझ्या नवऱ्याचे बँक खात्यावरून काढलेले पैसे आरोपींचे वैयक्तीक बँक खात्यात ठेवले त्याची चौकशी केलेली नाही.
तसेच शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल देउळगावराजा deulgaon raja येथील डॉक्टरने त्यांना उपचार होईल अश्या (हायर सेंटरला) हॉस्पीटलला दाखल करण्याचा सल्ला दिला असताना वरील आरोपीनी माझ्या पतीस उपचार होईल अश्या (हायर सेंटरला) हॉस्पीटलला हलवले नाही, अश्या प्रकारच्या मुद्यांचा विचार न करता कोणतीही समाधानकारण तपास तपासी अधिकारी करू शकले नाहीत. त्यामुळे माझ्या पतीचा पैशासाठी खून वरील आरोपींनी केला असावा असा माझा आरोप आहे तरी माझे पती सुशिल सखाराम खंडारे रा. गिरोली खु. ता. देउळगाव राजा, जि. बुलढाणा यांच्या संशयास्पद मृत्युची चौकशी होवून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करावेत .
या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा buldhna येथे लेकराबाळासह आमरण उपोषण करण्याची तसेच तरीही न्याय न मिळाल्यास दि ११ नोव्हेंबर २०२३ ला आझाद मैदान azad maidan मुंबई mumbai येथे आत्मदहन करण्याची नोटिस देवूनही प्राणघातक बंदुक, विनापरवाना व्यक्तींच्या कब्जांत असूनही पोलीस तपासी अधिकाऱ्यानी तपासात दिरंगाई केली.
व पोलिस तपासी अधिकारी हेमंत शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक पो.स्टे. देउळगावराजा यांनी आरोपींच्या सोईने व व आरोपींच्या खोटया जबाबास ग्राह्य धरून थातुरमातुर तपास करून आरोपींना मोकळे सोडून माझा तक्रार अर्ज पोलिस स्टेशनला फाईल केलाव आरोपींना सहकार्य केले, त्यामुळे तपासी अधिकाऱ्यावर तपासात कसूरी व दिरंगाई केल्याने, आरोपीस पाठीशी घातल्याने त्यांचेवर पोलिस खात्याच्या नियमाप्रमाणे कसुरी कारवाई करावी तसेच निलंबीत करावे अन्यथा मी दि.७ ऑक्टोबर १०२४ ला जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे लेकराबाळासह आमरण उपोषण करीत आहे